15 December 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Realme GT Neo 3 5G | रियलमी GT Neo 3 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी संधी, तब्बल 12 हजार बचत करा, ऑफर जाणून घ्या

Realme GT Neo 3 5G

Realme GT Neo 3 5G | ग्रेट सुपर प्राइसिंग डील रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह आहे. या ऑफरमध्ये तुम्ही कंपनीचा धांसू स्मार्टफोन रियलमी जीटी निओ 3 12,000 रुपयांमध्ये स्वस्तात खरेदी करू शकता. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 36,999 रुपये आहे. कंपनीच्या सुपर प्राइसिंग डीलमध्ये तो 24,999 रुपयांच्या डिस्काउंटवर उपलब्ध आहे. जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी मोबिक्विक वॉलेटचा वापर करत असाल तर तुम्हाला 10% कॅशबॅक देखील मिळेल. फोनमध्ये कंपनी 80 वॅट चार्जिंग आणि दमदार प्रोसेसरसह अनेक शानदार फीचर्स देत आहे. जाणून घेऊया सविस्तर.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून यात तुम्हाला डायमेंसिटी 8100 5G चिपसेट पाहायला मिळेल. फोनचा डिस्प्ले 2412×1080 पिक्सल रिझोल्यूशनसह येतो. या फुल एचडी+ डिस्प्लेचा आकार 6.7 इंच असून तो 120Hz’च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील ऑफर करत आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

यात 50 मेगापिक्सलचा मेन लेन्ससह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh’ची आहे, जी 80 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.

ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन अँड्रॉइड 12 वर आधारित रियलमी यूआय 3.0 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, वाय-फाय 5, वाय-फाय 4 आणि 802.11 ए/बी/जी, ब्लूटूथ 5.3, 5Gm 4G, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय आहेत.

News Title : Realme GT Neo 3 5G offer 19 August 2023.

हॅशटॅग्स

#Realme GT Neo 3 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x