3 May 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

उद्योगपतींना मोठ्या सवलती देणाऱ्या मोदी सरकाकडून शहीदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत फक्त रु.५०० ने वाढ

Narendra Modi

नवी दिल्ली : मोदी सरकार उद्योगपतींची जेवढे धडाडीचे निर्णय घेताना दिसते तसे निर्णय इतर विषयात खुल्या हाताने घेताना दिसत नाही. मात्र जेव्हा विषय शेतकरी आणि इतर राबणाऱ्या हातांचा येतो तेव्हा तुटपुंज्या वाढ करून स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते. तसाच प्रकार पुन्हा घडला आहे आणि अगदी त्या निर्णयावर सही करताना स्वतःचा व्हिडिओ टाकायला देखील मोदी विसरले नाहीत.

केंद्रात मोदी सरकार-२ स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदा कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी शहिदांच्या मुलांना मिळणाऱ्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नॅशनल डिफेन्स फंडाद्वारे येणाऱ्या ‘पंतप्रधान स्कॉलररशीप योजने’त मोठे फेरबदल करण्यात आले असून दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मुलांची स्कॉलरशीप दरमहा २ हजार रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, मुलींची स्कॉलरशीप २२५० रुपयांवरून ३००० रुपये करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना नरेंद्र मोदींनी लिहिले आहे की, ‘आमच्या सरकारचा पहिला निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी समर्पित आहे.’ मात्र स्वतःच्या घरातील कमावत्या व्यक्तीचे छत्र हरपल्यावर एवढ्या तुटपुंज्या रकमेत शहिदांच्या मुलांना नक्की काय करणं शक्य आहे ते सुद्धा सरकारने विचारात घेणं गरजेचं आहे. कारण एखाद्या घोटाळेबाज उद्योगातीचे अब्जो रुपयांचे कर्ज नॉन फार्मोर्मिंग असेट्स घोषित करताना जसा जरादेखील विचार केला जात नाही, तसाच काहीसा विचार या विषयाला अनुसरून सरकारने थोडा हात सैल करून अधिक स्कॉलरशिप दिली असती तर सर्वांनाच निर्णय आवडला असता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या