
Paramount Share Price | पॅरामाउंट कम्युनिकेशन्स या फायबर ऑप्टिकल केबल क्षेत्रात एक नंबर मानल्या जाणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 261 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के वाढीसह 54.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले की, पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीच्या संचालक मंडळाने व्हॅलेन्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील 100 टक्के भाग भांडवल खरेदी करून कंपनीचे अधिग्रहण करण्यात मान्यता दिली आहे. आज 23 ऑगस्ट रोजी पार होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
व्हॅलेन्स टेक्नॉलॉजीज ही कंपनी हाय डेन्सिटी पॉलीथिलीन पाईप बनवण्याचा व्यवसाय करते. हा एक प्रकारचा लवचिक प्लास्टिक पाईप असतो ज्याचा वापर मुख्यतः द्रव आणि वायू वहन करण्यासाठी केला जातो. काही वेळा अशा पाईप्सचा वापर जुन्या काँक्रीट आणि स्टीलच्या मुख्य पाइपलाइनला पर्याय म्हणून देखील केला जातो.
पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,313.17 कोटी रुपये आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.49 टक्के वाढीसह 55.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जून 2023 तिमाहीत पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 100 टक्क्यांच्या वाढीसह 14.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 7.03 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. पॅरामाउंट कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स अवघ्या एका महिन्यात 33 टक्क्यांनी मजबूत झाले आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 61.65 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 261.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 557 टक्के नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.