15 December 2024 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मोदी सरकारकडून मेहूल चोकसी व रामदेव बाबांसह ५० कर्जबुडव्यांचं कर्ज माफ, संतापाची लाट

Mehul Choksi, Ramdev Baba, Scammer, Loan Waiver, RBI Inform

नवी दिल्ली, २८ एप्रिल: “करोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर प़डू शकतात. ही आपल्यासाठी संधी आहे. राज्यांनी ही गुंतवणूक आपल्याक़डे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा” असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. सध्या देशांतर्गत आर्थिक घडामोडींवरून अशा घटना घडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनेक चुकीच्या तसेच सामान्यांच्या हिताच्या नसलेल्या गोष्टी घडल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याचं धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसीचं नावही समाविष्ट आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी यासाठी ही माहिती मागवली होती कारण राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही उत्तर दिले नव्हते. म्हणूनच मी आरटीआय अंतर्गत हा अर्ज केल्याचं त्यांनी सांगितले.

जे सत्य मोदी सरकारने लपवलं त्याची माहिती आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी २४ एप्रिलच्या उत्तरामध्ये दिली आहे. ज्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरबीआयच्या उत्तरात ६८ हजार ६०७ कोटी रक्कमेचा थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या / हेतूपूर्वक राइट ऑफ (बुडवलेली) रक्कमेचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची अशी कर्जे राइट ऑफ करण्यात आली आहेत. देशातील सर्वोच्च बँकेने सुप्रीम कोर्टाच्या १६ डिसेंबर २०१५ च्या निकालाचा हवाला देत कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास नकार दिला आहे.

परंतु याच मेहुल चोक्सीला पंतप्रधान नरेंद्र मोदी तो भारतातून फरार होण्यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात “मेहुल-भाई” बोलले होते. याची कल्पना ईडीला होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. नरेंद्र मोदी मेहुल चोक्सीला ‘मेहुलभाई” बोलल्याचं व्हिडिओ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला होता आणि तोच व्हिडिओ आम्ही आज तुमच्यासोबत पुन्हा शेअर करत आहोत.

 

News English Summary: The Reserve Bank of India (RBI) has written off Rs 68,607 crore in loans to 50 big debtors. It also includes the name of Mehul Choksi, a fugitive accused in the PNB scam. This fact has come to light from the information requested under RTI. RTI activist Saket Gokhale has written off 50 big debts and what is their debt status till February 16? This information was requested.

News English Title: Story RBI writes over Rs 68000 Crore loans scammer Mehul Choksi 50 top wilful defaulters News latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x