19 May 2024 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Multibagger Stock | साखरेचा गोडवा! रावलगाव शुगर शेअरने अल्पावधीत 130 टक्के परतावा दिला, शेअरची डिटेल्स जाणून घ्या

Multibagger Stock

Multibagger Stock | रावलगाव शुगर फार्म लिमिटेड कंपनीच्या शेअरने अवघ्या 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के नफा कमवून दिला आहे. 30 ऑगस्ट 2023 रावलगाव शुगर फार्म लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या कंपनीने आपले 50 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर अंतिम मंजुरी घेतली जाईल. रावलगाव शुगर फार्म लिमिटेड ही कंपनी मिठाई आणि टॉफी बनवण्याचा व्यवसाय करते. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी रावलगाव शुगर फार्म लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5,324.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कंपनी मुख्यतः मिठाई बनवण्याच्या व्यवसायात

रावलगाव शुगर फार्म लिमिटेड ही कंपनी मुख्यतः मिठाई बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आपली उत्पादने विकते. जून 2023 पर्यंत रावलगाव शुगर फार्म्स कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 53.3 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 46.64 टक्के भाग भांडवल धारण केले होते. 21 ऑगस्ट 2023 रोजी रावलगाव इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आणि एका दिवसात शेअरची किंमत 253 रुपयेने वाढून 5324 रुपये किमतीवर पोहोचली होती.

शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी

रावलगाव शुगर फार्म कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6153 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2257 रुपये होती. मागील 1 वर्षात रावलगाव शुगर फार्म कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के नफा कमावून दिला आहे. रावळगाव शुगर फार्म कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 43 टक्के नफा कमावून दिला आहे.

शेअरने किती परतावा दिला

रावळ गाव शुगर फार्म कंपनी एकूण बाजार भांडवल 3631 कोटी रुपये आहे. रावलगाव शुगर फार्म लिमिटेड कंपनीच्या स्टॉकची किंमत मागील 5 दिवसात 16 टक्के वाढली आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 40 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर या मागील 6 महिन्यांत रावलगाव शुगर फार्म लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock for investment on 24 August 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x