19 May 2024 6:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Varun Beverages Share Price | मालामाल शेअर! असे शेअर्स निवडा, गुंतवणुकीवर 400 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगर शेअर तपशील जाणून घ्या

Varun Beverages Share Price

Varun Beverages Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने अल्पावधीत लोकांना उत्कृष्ट नफा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षांत वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने लोकांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

24 ऑगस्ट 2023 रोजी वरुण बेव्हरेजेस कंपनीचे 0.27 टक्क्यांच्या घसरणीसह 884.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.14 लाख कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी वरुण बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के घसरणीसह 873.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जून तिमाही कामगिरी :

वरुण बेव्हरेजेस कंपनी आर्थिक वर्ष म्हणून जानेवारी-डिसेंबर असे वेळापत्रक पालन करते. म्हणजे एप्रिल ते जून ही वरुण बेव्हरेजेस कंपनीसाठी दुसरी तिमाही ठरते. वरुण बेव्हरेजेस कंपनीने आपल्या दुसऱ्या तिमाहीत 25.36 टक्के वाढीसह 1005.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वाढलेल्या महसूलामुळे आणि चांगल्या मार्जिन वाढीमुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यात ही वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून तिमाहीत वरुण बेव्हरेजेस कंपनीने 802.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जून 2023 तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 13.6 टक्क्याच्या वाढीसह 5,699.73 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 5,017.57 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीचा EBITDA जून तिमाहीत 21 टक्क्यांच्या वाढीसह 1,510.9 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी कंपनीचा EBITDA फक्त 1,250.4 कोटी रुपये नोंदवला गेला होता. EBITDA मध्ये ही वाढ उच्च सकल मार्जिन आणि कार्यक्षमतेमुळे पाहायला मिळाली आहे. वरुण बेव्हरेजेस कंपनीचा EBITDA मार्जिन 26.5 टक्के आहे, जो मागील वर्षी 25 टक्के होता.

वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 72 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

मागील 3 वर्षात शेअरने 430 टक्के परतावा दिला

मागील 3 वर्षात वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने लोकांना 430 टक्के परतावा कमावून दिला आहे. वरुण बेव्हरेजेस ही कंपनी अमेरिकेच्या बाहेर पेप्सिकोची फ्रँचायझी चालवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.14 लाख कोटी रुपये आहे. बाजार भांडवलाच्या बनतील वरुण बेव्हरेजेस या कंपनीचा भारतात चौथा क्रमांक लागतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varun Beverages Share Price today on 25 August 2023.

हॅशटॅग्स

#Varun Beverages Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x