11 May 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक
x

Alok Industries Share Price | रिलायन्सची गुंतवणूक! शेअरची किंमत 20 रुपये, शेअरने 1 महिन्यात 22% परतावा दिला, काल 12% परतावा

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12.5 टक्के वाढीसह 20.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या हा स्टॉक 21.7 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक सुसाट तेजीत धावत होता, त्या तुलनेत आज शेअर संथ गतीत वाढत आहे. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 20.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

काही वर्षापुर्वी आलोक इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यापारी मुकेश अंबानी गुंतवणूक केली होती. आता ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या उद्योग समुहाचा भाग म्हणून व्यवसाय करते. 14 ऑगस्ट 2023 रोजी मुकेश अंबानी यांनी चालू आर्थिक वर्षात आपल्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमार्फत आपल्या उपकंपन्यांमध्ये 14,200 कोटी रुपयेची गुंतवणूक करणार अशी घोषणा केली होती. यापैकी 7,000 कोटी रुपये आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये गुंतवले जाणार आहे.

मागील एका महिन्यात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीमध्ये RIL कंपनीने गुंतवणूक करून 40.01 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. तर JM ARC कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आलोक इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः कापूस आणि पॉलिस्टर क्षेत्रात व्यवसाय करते. आणि ही कंपनी भारतातील सर्वात मोठी पूर्णतः एकात्मिक वस्त्र व्यवसाय करणारी कंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x