
BCL Industries share Price | BCL इंडस्ट्रीज या FMCG, रिअल इस्टेट आणि इथेनॉल उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 14 टक्के वाढीसह 428.7 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचा EBITDA 39.5 कोटी रुपये रुपये असून त्यात वर्षभराच्या आधारावर 31 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 493.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात BCL इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 486 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आणि महिला 1 महिन्यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 310 रुपयेवरून वाढून 486 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील 2.5 वर्षांत BCL इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्के वाढवले आहे. 26 मार्च 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 103 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर या किंमत पातळीवरून, BCL इंडस्ट्रीजच्या शेअर्सने आता 380 टक्के वाढले आहेत. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 1021 कोटी रुपये आहे. BCL इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 530 रुपये होती. आणि नीचांक किंमत पातळी 278 रुपये होती.
शेअर आणखी 100 टक्के वाढू शकतात
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी 100 टक्के वाढू शकतात. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने पश्चिम बंगाल राज्यात एक नवीन प्लांट बनवला आहे ज्याचे उत्पादन काम सुरू झाले आहे. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या इथेनॉल कंपनीच्या व्यवसायात व्हॉल्यूम आणि मूल्य दोन्हीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. ही कंपनी पंजाबमध्ये पुढील तीन महिन्यात 200 किलो लिटर प्रति दिवस क्षमतेचा इथेनॉल प्लांट सुरू करणार आहे.
इथेनॉलच्या किमतीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाल्यामुळे BCL इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये किंचित मंदी आली होती. आता ही कंपनी आपलीइथेनॉल उत्पादन क्षमता प्रतिदिन 200 किलोलिटरवरून वाढवून 600 किलोलिटर प्रतिदिन पर्यंत नेणार आहे. भरघोस कमाई करण्यासाठी तुम्ही बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करून फायदा घेऊ शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.