20 May 2024 12:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Lok Sabha Election | 'इंडिया आघाडी' भाजपाला हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठा धक्का देणार, दिग्गज नेते हरियाणा दौऱ्यावर, कारण काय?

Lok Sabha Election

Lok Sabha Election | सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपूर्वी आपली छावणी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेली INDIA आघाडी आता अकाली दलासोबत मैत्री वाढवत आहे. दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी हरियाणातील कैथल जिल्ह्यात रॅली होणार आहे. यात INDIA आघाडीतील अनेक पक्षांचा समावेश असून अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल हेही व्यासपीठावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

रॅलीच्या व्यासपीठावर इंडिया आघाडीचे नेते दिसणार

माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या जयंतीनिमित्त इंडियन नॅशनल लोकदलातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांची जयंती पक्ष सन्मान दिन म्हणून साजरा करत आहे. कैथलमध्ये होणाऱ्या रॅलीच्या व्यासपीठावर नितीशकुमार, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला यांसारखे विरोधी पक्षनेते दिसणार आहेत.

खरं तर अकाली दल आणि ओमप्रकाश चौटाला कुटुंबात चांगले संबंध आहेत. या संबंधांचा वापर करून नितीशकुमार अकाली दलाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अकाली दलाची भूमिकाही नरम असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे देखील या बैठकीला उपस्थित राहू शकतात, असं वृत्त आहे. विरोधकांच्या ऐक्याचे दर्शन म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जाऊ शकतं. मात्र, अद्याप कॉंग्रेसकडून निमंत्रण किंवा सामील होण्याची कोणतीही बातमी आलेली नाही.

अकाली दलाने पाऊल उचलले आणि शक्यता वाढल्या

दरम्यान, अकाली दलानेही एक पाऊल उचलले असून यामुळे भाजपकडे जाणारा रस्ता बंद झाल्याचे मानले जात आहे. रविवारी अकाली दलाने पंजाबमधील लोकसभेच्या सर्व १० जागांसाठी प्रभारी निश्चित केले. यामध्ये अमृतसर आणि गुरुदासपूरचा समावेश आहे, जिथून भाजप निवडणूक लढवताना दिसत आहे. याशिवाय होशियारपूर मतदारसंघावरही भाजपने दावा केला आहे. 2021 मध्ये अकाली दलात प्रवेश केलेले भाजपचे माजी नेते अनिल जोशी यांना अमृतसरचे प्रभारी करण्यात आले आहे.

News Title : Lok Sabha Election Akali Dal on Devilal Jayanti INDIA alliance leaders will present 11 Sept 2023 Marathi news.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x