20 May 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Libya Flood Derna City | समुद्राचा तांडव आणि महा-आपत्ती! लिबियात पुरामुळे तब्बल 20 हजार लोकांचा मृत्यू, अर्धे शहर घरांसहित उद्ध्वस्त

Libya flood

Libya Flood Derna City | लिबियात समुद्राला आलेल्या भीषण पुरामुळे २० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनांची चौकशी करण्यात यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लिबियाच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यात मारल्या गेलेल्यांचे मृतदेहही सापडणं अशक्य झालंय. बचाव कार्यात सहभागी असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, समुद्रातील पूर शहरात शिरला होता आणि त्याच्या पाण्यासह बरेच लोक वाहून गेले होते. यातील बहुतेकांचा मृत्यू झाल्याचे मानले जात असले तरी मृतदेह शोधणे कठीण होत आहे. लिबियातील डेरना शहराचा जवळपास अर्धा भाग समुद्राच्या तांडवाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

शहरातील मृतांचा आकडा १८ ते २० हजारांवर पोहोचला

डेरना शहराचे महापौर अब्दुलमेनम अल-घैथी यांनी सांगितले की, शहरातील मृतांचा आकडा १८ ते २० हजारांवर पोहोचला आहे. इतकंच नाही तर आता महामारी पसरण्याची मोठी भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे. मृतदेह पाण्यात सडत असून पाण्यासह रस्त्यावर घाण वाहत आहे. त्यामुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, जागतिक हवामान संघटनेचे म्हणणे आहे की, लिबियातील इतके मृत्यू टाळता आले असते. लिबियात गेल्या दशकभरापासून यादवी युद्ध सुरू असून तेथे दोन वेगवेगळी सरकारे आहेत. परिस्थिती अशी आहे की, हवामान विभाग लिबियात सक्रिय नाही.

पुराचा अंदाज वेळीच स्पष्ट झाला असता तर…

देशात हवामान विभाग सक्रीय असता तर त्यांच्यावतीने काही अंदाज वर्तवले गेले असते आणि मग लोकांना वाचवता आले असते. पुराचा अंदाज वेळीच स्पष्ट झाला असता तर लोकांना आधीच कुठेतरी हलवण्यात आले असते, असे जागतिक संघटनेने म्हटले आहे. याशिवाय बचावकार्यासाठीही पुरेसा वेळ आहे. शिवाय डर्मा शहर आधीच धोक्यात आल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले. शहरात काही बंधारे बांधावेत, अन्यथा समुद्रकिनारी असलेल्या या शहराला केव्हाही भीषण आपत्तीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला होता.

काही मिनिटात इमारती कोसळल्या

डर्मा शहरात आलेला पूर इतका भीषण होता की, काही मिनिटांतच मोठमोठ्या इमारती कोसळल्या. अशी अनेक कुटुंबे आहेत जी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि एकही सदस्य शिल्लक राहिलेला नाही. एका व्यक्तीने सांगितले की, या आपत्तीत त्याने आपल्या संयुक्त कुटुंबातील 13 सदस्य गमावले आहेत. पुराचे गांभीर्य यावरून समजू शकते की, सामूहिक रित्या मृतदेह दफन केले जात आहेत आणि जेसीबीच्या साहाय्याने कबरी खोदल्या जात आहेत. आफ्रिकन देश लिबियातील यादवी युद्धाची परिस्थिती आणि पायाभूत सुविधांवर गेल्या १० वर्षांपासून वाईट परिणाम झाला आहे.

News Title : Libya flood kills 20000 people in Derna city 15 September 2023.

हॅशटॅग्स

#Libya Flood Derna City(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x