21 January 2025 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Viral Video | महिला पत्रकार कॅमेऱ्यात लाईव्ह रिपोर्टिंग करत होती, अचानक मागून त्या तरुणाने असा स्पर्श केला आणि काय घडलं?

Viral Video

Viral Video | स्पेनमधील माद्रिद मध्ये लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान एका स्पॅनिश टीव्ही पत्रकाराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पत्रकार इसा बालाडो चॅनेल कुआत्रोसाठी माद्रिदमध्ये झालेल्या दरोड्याचे लाइव्ह रिपोर्टिंग करत असताना एक व्यक्ती तिच्याजवळ आली.

पाठीमागून त्याने रिपोर्टींग करणाऱ्या महिलेच्या अंगावर हात फिरवला आणि ती कोणत्या चॅनेलसाठी काम करते, अशी विचारणा केली. त्यानंतरही महिला पत्रकाराने आपले लाईव्ह वार्तांकन सुरूच ठेवले. मात्र या कार्यक्रमाचे स्टुडिओतून सूत्रसंचालन करणारे वरिष्ठ पत्रकार आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विचारले, “इसा, तुम्हाला मध्येच थांबवल्याबद्दल मला माफ करा… पण त्याने तुला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला का?”

यानंतर टीव्ही रिपोर्टर महिलेने हो असे उत्तर दिले, त्यानंतर होस्टने त्या व्यक्तीला कॅमेऱ्यासमोर आणण्यासाठी सांगितले. होस्ट म्हणाले, “कृपया त्या माणसाला माझ्यासमोर ठेवू शकाल का?” या मूर्ख माणसाला माझ्यासमोर ठेवा. यानंतर रिपोर्टर आरोपी व्यक्तीला म्हणाली, ‘आम्ही कोणत्या चॅनेलचे आहोत, हे तुम्हाला विचारायचे आहे. तू मला चुकीच्या ठिकाणी हात लावलास का? मी लाइव्ह शो करत आहे आणि माझे काम करत आहे.

मात्र, त्या व्यक्तीने आपण काहीही चुकीचे केले नसल्याचा स्पष्ट इन्कार केला आणि यावेळी तो पुन्हा तिच्या केसांना स्पर्श करून निघून गेला. काही सेकंदांनी जेव्हा ती ऑन एअर झाली तेव्हा तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि म्हणाला की तिने सत्य सांगावे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माद्रिद पोलिसांनी लाइव्ह ऑन एअर पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्या तरुणाला अटक केली आहे. ‘एक्स’वर शेअर करण्यात आलेल्या क्लिपमध्ये या व्यक्तीला दोन पोलिस अधिकारी बेड्या लावताना दिसत आहेत. या प्रकरणी टीव्ही चॅनेलनेही एक निवेदन जारी करत कोणत्याही प्रकारचा लैंगिक छळ सहन केला जाणार नाही असं स्पष्ट करत रिपोर्टरला पाठिंबा व्यक्त केला आहे.

News Title : Viral Video of man touched woman from behind during live reporting 15 September 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x