19 April 2024 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Viral Video | वेदनादायी क्षण! बाप आपल्या मुलाला 'मृतदेहांच्या ढिगाऱ्यात असा शोधत होता, 'माझा मुलगा सापडत नाही!'

Viral Video

Viral Video | ओडिशा रेल्वे दुर्घटनेमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 288 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून हजारो प्रवासी गंभीर जखमी आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला अत्यंत वेदना देऊन जाईल.

ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या ढिगाऱ्यात एका शोकाकुल पित्याने आपल्या मुलाचा शोध घेतल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असहाय बाप आपल्या मुलाला अनेक मृतदेहांमध्ये शोधत आहे. ही ५५-६० वर्षांची व्यक्ती प्रत्येक मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कपडा बाजूला करून आणि पुन्हा पांढऱ्या चादरीने चेहरा झाकताना दिसत आहे.

रेल्वे अपघातानंतर घटनास्थळाजवळील एका शाळेत मृतदेहांचा ढिगारा दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती आपल्या मुलाच्या शोधात अनेक मृतदेह पडताळून बघताना दिसत आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. ती व्यक्ती रडते आणि म्हणते की त्यांनी सर्व मृतदेह शोधून पाहिले आहेत. परंतु त्याचा मुलगा सापडला नाही. व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव रवींद्र शॉ असल्याचे सांगितले जात आहे.

ते आपला मुलगा गोविंदा शॉसोबत प्रवास करत होते. कुटुंबावरील १५ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी वडील आणि मुलगा दोघेही बाहेर गावी जातं होते. आता अपघातात मुलगा बेपत्ता असल्याने वडील अस्वस्थ झाले आहेत. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती विचारते, “तुम्हाला मुलगा मिळाला का?” नाही इथे (मृतदेहांचा ढिगारा) सापडत नाही असं उत्तर हतबल झालेल्या पित्याने दिले.

News Title : Viral Video Odisha Train Tragedy a grieving father searching for his son check details on 03 June 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x