Sri Lanka Crisis Video | महागाईने श्रीलंकेतील जनतेच्या संतापाचा कडेलोट | राजकीय नेत्यांना रस्त्यात तुडवायला सुरुवात
Sri Lanka Crisis | श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकट, प्रचंड महागाई, पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांच्या हिंसक हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एका व्हायरल व्हिडीओमध्ये एसजेबीच्या खासदार रजिता सेनारत्ने यांच्यावर आंदोलकांनी हल्ला केला. संतापलेली आंदोलक जनता भर रस्त्यात राजकीय नेत्यांना मारहाण करत असल्याचं पाहायला मिळतंय.
एएनआय या वृत्तसंस्थेने शनिवारी ही माहिती दिली. तर दुसरीकडे श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी देश सोडून पलायन केल्याची माहिती आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेतील निदर्शकांनी शनिवारी राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या येथील शासकीय निवासस्थानी घुसून बॅरिकेड्स हटवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Colombo | In a viral video, SJB MP Rajitha Senaratne attacked by protesters as agitation erupts on the streets amid the ongoing economic crisis.
Sri Lankan President Gotabaya Rajapaksa has reportedly fled the country pic.twitter.com/A09tBsPmi7
— ANI (@ANI) July 9, 2022
सरकार विरोधातील निदर्शकांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या :
शनिवारी सकाळी निदर्शकांना अध्यक्षीय निवासस्थानी प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव केला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र, आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवून राष्ट्रपतींच्या निवासस्थानी प्रवेश केला.
#WATCH | Sri Lanka: People gather in large numbers outside the Presidential Secretariat in Colombo as the beleaguered island-nation witnesses massive protests amid ongoing economic turmoil
(Source: Reuters) pic.twitter.com/H2AprxYxsN
— ANI (@ANI) July 9, 2022
पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी तातडीची बैठक बोलावली:
दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी शनिवारी राजकीय पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावून जनतेच्या आक्रोशामुळे देशावर निर्माण झालेल्या संकटावर चर्चा केली, विक्रमसिंघे यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी पक्षाची तातडीने बैठक बोलावली असून संसदेचे तातडीने अधिवेशन बोलावण्याची विनंती सभापतींना केली आहे. मे महिन्यात सरकारविरोधी निदर्शनांमुळे राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांचे थोरले बंधू महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.
स्पेशल टास्क फोर्स आणि लष्कराची मोठी तुकडी तैनात :
गॉल, कँडी आणि मटारा या शहरांमध्येही आंदोलकांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली आणि अधिकाऱ्यांना कोलंबोसाठी गाड्या चालवण्यास भाग पाडले. या भागात पोलिस, विशेष टास्क फोर्स आणि लष्कराच्या मोठ्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ‘होल कंट्री टू कोलंबो’ चळवळीच्या आयोजकांनी सांगितले की, कोलंबो किल्ल्यावरील निदर्शकांमध्ये सामील होण्यासाठी लोक उपनगरातून चालत जात होते. गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Sri Lanka Crisis peoples attacked on political party leaders check details 09 July 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट