9 May 2025 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मोदींसाठी २०१९ मधील लोकसभा निवडणूक बिकट, नाराज मित्रपक्ष वाढतच आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिवसेना, आंध्र प्रदेश मधील टीडीपी आणि त्यात आता एनडीए मधील अजून एका मोठ्या नाराज घटक पक्षाची वाढ झाली आहे. त्यामुळे मोदींसाठी २०१९ मधील लोकसभा निवडणूक बिकट होत चालली आहे.

भाजप देशभर वेगाने विस्तार करत असली तरी दिवसेंदिवस एनडीए मधील वाढत असलेली नाराज घटक पक्षांची संख्या ही भाजप साठी २०१९ लोकसभा निवडणुकीत मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण महाराष्ट्रातील शिवसेना, आंध्र प्रदेश मधील टीडीपी नंतर आता पंजाब मधील प्रमुख पक्ष अकाली दल सुध्दा मोदी सरकारवर खूप नाराज असल्याचे कळते.

सध्या अकाली दलाचे पंजाब मधून एकूण ४ खासदार आहेत. वाजपेयी पंतप्रधान असताना ते एनडीए मधील सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन आणि महत्व देऊन सरकार चालवत होते. परंतु नरेंद्र मोदी हे एनडीएतील घटक पक्षांना महत्वच देत नाहीत अशी थेट टीका अकाली दलाचे पंजाबचे खासदार सुखदेव ढींढसा यांनी मोदी सरकारवर केली आहे. अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर या सध्या मंत्रिमंडळात असतानाही अकाली दलाच्या एका खासदाराने अशी उघडपणे टीका केल्याने नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी २०१९ मधील लोकसभेची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे.

काही महिन्यापूर्वी नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपला घराचा अहेर देत नाराजी व्यक्त केली होती आणि काही दिवसातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या