
Berger Paints Share Price | बर्जर पेंट्स कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 5 टक्क्यांपेक्षा जास्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बर्जर पेंट्स कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. बर्जर पेंट्स कंपनीने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअर्सवर 1 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती आणि त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 23 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला होता.
आज शनिवारी शेअर बाजार बंद असल्याने या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी एक्स बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी बर्जर पेंट्स कंपनीचे शेअर्स 6.85 टक्के वाढीसह 670.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बर्जर पेंट्स कंपनीचे शेअर्स 627.30 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र काही तासात या स्टॉकने इंट्रा-डे ट्रेडमध्ये 658.50 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. ही बर्जर पेंट्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 439.49 रुपये होती. आणि बर्जर पेंट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 76,522.83 कोटी रुपये आहे.
9 ऑगस्ट 2023 रोजी बर्जर पेंट्स कंपनीच्या संचालक मंडळाने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत संचालकांनी आपल्या पात्र शेअर धारकांना 5 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा 8 सप्टेंबर 2023 रोजी शेअर धारकांची मंजुरी घेऊन बोनस शेअर्सची योजना अंतिम करण्यात आली. आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीने सेबी ला कळवले की, कंपनीने शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 23 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.