7 May 2024 4:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार? Anup Engineering Share Price | दणादण परतावा देणारा शेअर! 1 दिवसात 19% वाढला, यापूर्वी दिला 876% परतावा
x

संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार: निलेश राणे

Nilesh Rane, Aaditya Thackeray, Udhav Thackeray, Shivsena, Sanjay Raut

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविण्याचे भाष्य केले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी बुधवारी वृत्तवाहिनीशी बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले होते. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील. मात्र राज्यातील जनतेला तरुण चेहऱ्याची आवश्यकता आहे. राज्यातील जनता आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल, असे विधान त्यांनी केले होते.

या विधानाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी बुधवारी रात्री ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली. “संजय राऊत यांच्यासारखी लोकं ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार, देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये”, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, रत्नागिरीचे माजी खासदार नीलेश राणे यांनी नाणार प्रकल्पावरुनही शिवसेना- भारतीय जनता पक्षाच्या युतीवर टीका केली. युती करण्यासाठी ज्या घाईने प्रकल्प रद्द केला तो फक्त देखावा होता. कोकणातल्या जनतेला कधी कळणार?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x