13 August 2020 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राष्ट्रवादी भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत | अजित पवार आणि जयंत पाटलांवर जवाबदारी हे काय? खासदार अदाणींच्या सौजन्याने वस्तू वाटप करतात | आमदारांचे अदाणी विरोधात मोर्चे राजदीप सरदेसाईंकडून प्रणव मुखर्जीच्या मृत्यूचं ट्विट | नंतर माफी | कुटुंबियांकडून खेद व्यक्त पार्थ पवार हे थोडे अपरिपक्व असल्याचं पवारांनी म्हटलं आहे | हिंदीत नया है वह - छगन भुजबळ डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू पार्थ पवारांच्या समर्थनार्थ | सध्या ते भाजपमध्ये आहेत पारदर्शक करप्रणाली सुरु | पण फेसलेस कर प्रणाली म्हणजे काय - सविस्तर राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुख महंतांना कोरोनाची लागण | मोदींसोबत मंचावर हजर होते
x

कल्याणमध्ये मतदानानंतर तब्बल ३२३ ईव्हीएम २३ तासापासून गायब

Loksabha Election 2019, EVM

मुंबई : कल्याण लोकसभा निवडणूक मतदार संघात सोमवारी मतदान कोणत्याही गालबोटाशिवाय पार पडलं. मात्र, मतदानानंतर या लोकसभा मतदार संघातील तब्बल ३२३ ईव्हीएम मशीन २३ तास बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. सोमवारी रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आली. या भागात झालेले मतदानाचा हिशोब करताना तब्बल ३२३ ईव्हीएम मशीन गायब असल्याचं समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

कल्याण लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम आणि संबंधित सामान डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले चित्रपटगृहाच्या स्ट्राँग रुममध्ये त्याच रात्री पोहचणं अपेक्षित होतं. परंतु, असं घडलं नाही. यावर शिवसेनेनं देखील तीव्र आक्षेप घेतलाय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे. ईव्हीएम गायब कसे आणि कुठे झाले होते? असा प्रश्न विचारत शिवसेना नेते निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दाखल झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी मीडियाशी बोलताना, आयोगाचे प्रतिनिधी आपल्याला योग्य सूचना देत नव्हते, असं म्हटलंय.

तब्बल २३ तासानंतर ३२३ ईव्हीएम सुरक्षित निश्चित जागेवर दाखल झाले आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या जीवात जीव आला. सर्व ईव्हीएम त्याच जागेवर होती जिथे ती तैनात करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी शिवाजी कादबने यांनी दिलीय. राजकीय पक्षांना मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचं हे स्पष्टीकरण पटलेलं दिसत नाही.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x