
Alphalogic Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत वाढत आहेत. अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 252 रुपये होती. नीचांक पातळी किंमत 95 रुपये होती.
अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 97 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 129.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी अल्फालॉजिक इंडस्ट्रीज स्टॉक 5 टक्के वाढीसह 220.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
अल्फालॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, कंपनीला स्टोरेज रॅकिंग सिस्टमची रचना, उत्पादन, पुरवठा आणि स्थापनेसाठी स्विगी कंपनीकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमध्ये अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीला स्टोरेज रँकिंग सिस्टम तयार करायचे काम देण्यात आले आहेत. हे स्टोरेज सिस्टीम तामिळनाडू राज्यातील चेन्नई, मध्य प्रदेश राज्यातील इंदूर आणि नवी मुंबईतील वाघोली या तीन ठिकाणी तयार केले जाणार आहे. या संपूर्ण ऑर्डरचे एकूण मुल्य 70 लाख रुपये आहे.
Scotsy Logistics Private Limited या Swiggy कंपनीच्या उपकंपनीकडून अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीला ही ऑर्डर देण्यात आली आहे. यापूर्वी, अल्फा लॉजिक इंडस्ट्रीज कंपनीला पुणे येथे एस पॅलेसचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा आणि स्थापनेसाठी रोमर्ट मटेरियल सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मोठी ऑर्डर देण्यात आली होती. या ऑर्डरचे एकूण मुल्य 14 लाख रुपये आहे. ही ऑर्डर चालू तिमाहीत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
जुलै 2023 नंतर शॉपर्स स्टॉप कंपनीने अल्फा लॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला स्टोरेज रॅक सिस्टम आणि स्टाफ लॉकर्स तयार करण्याचे काम दिले होते. तेलंगणा राज्यातील वारंगल येथील शॉपर्स स्टॉप स्टोअरसाठी अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीला डिझाईन, उत्पादन, वितरण आणि स्थापनेचे कंत्राट देण्यात आले होते. या ऑर्डरचे मूल्य 6 लाख रुपये होते. अल्फा लॉजिक इंडस्ट्रीज कंपनीने ऑगस्ट 2023 अखेर ही ऑर्डर पूर्ण करणे अपेक्षित आहे.
14 ते 28 जुलै 2023 दरम्यान, अल्फालॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात गुंतवणुकीचे आगमन झाले आहे. लक्ष्मी राणी चामरिया यांनी अल्फा लॉजिक कंपनीचे 39,600 शेअर्स 119 रुपये किमतीवर खरेदी करून गुंतवणूक केली आहे. आणि दीप्ती जैन यांनी अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे 28,804 शेअर्स 96.79 रुपये किमतीवर खरेदी करून गुंतवणूक केली आहे.
सारंगा बी यांनी अल्फा लॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे 81600 शेअर्स 96 रुपये किमतीवर खरेदी करून गुंतवणूक केली आहे. आणि अभिषेक कुमार महिपाल यांनी अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीचे 32400 शेअर 96 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. या घाऊक सौद्यांमुळे अल्फा लॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.