
Travel Without Visa | परदेशात जाण्यासाठी सहसा व्हिसा आणि पासपोर्ट या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते, परंतु काही देश असे आहेत जिथे भारतीय व्हिसाशिवाय केवळ पास पोर्टच्या मदतीने प्रवास करू शकतात, तसेच जगात असे अनेक देश आहेत जिथे आपल्याला त्या देशाच्या विमानतळावर पोहोचून व्हिसा घ्यावा लागतो.
म्हणजेच पासपोर्टच्या मदतीनेच तुम्ही त्या देशात पोहोचू शकता आणि व्हिसा ऑन अरायव्हलच्या सेवेचा लाभ घेऊ शकता, तर जाणून घेऊया त्या देशांची नावे जिथे तुम्ही व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हलशिवाय प्रवेश करू शकता तसेच जाणून घेऊया की तुम्ही त्या देशात किती दिवस राहू शकता.
मीडिया रिपोर्टनुसार, तुम्ही व्हिसाशिवाय 30 दिवसांपर्यंत सेशेल्सला प्रवास करू शकता. व्हिसाशिवाय तुम्ही नेपाळला १८० दिवस आणि भूतानला ७ दिवस भेट देऊ शकता.
खाली कोणत्या देशात किती दिवस व्हिसा फ्री प्रवास करू शकता त्याची यादी
* हाँगकाँग एसएआरमध्ये ९० दिवस
* कतारमध्ये १८० दिवस
* मॉरिशसमध्ये ९० दिवस
* मालदीवमध्ये ९० दिवस
* स्वालबार्डमध्ये ३० दिवस
* श्रीलंकेत ३० दिवस
* इंडोनेशियात ३० दिवस
* थायलंडमध्ये ३० दिवस
* मॉन्टसेरातमध्ये १८० दिवस
* बार्बाडोसमध्ये १८० दिवस
* डोमिनिकामध्ये ९० दिवस
* ग्रेनेडामध्ये ९० दिवस
* हैतीमध्ये ९० दिवस
* एल साल्वाडोरमध्ये ९० दिवस
* सेंट लुसियामध्ये 90 दिवस
* नीव आयलंडमध्ये 30 दिवस
* सर्बियामध्ये 30 दिवस
या देशांमध्ये प्रवास करताना आधी व्हिसा घेण्याची गरज नसली तरी विमानतळावर पोहोचून व्हिसा घ्यावा लागेल, याची खूप काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर व्हिसा ऑन अरायव्हल मिळवण्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल फीही भरावी लागते. तुम्हाला व्हिसा मिळाला आहे तेवढेच दिवस तुम्ही राहू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.