15 May 2024 6:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 3 शेअर्स खरेदी करता येतील, अल्पावधीत 1100 टक्के परतावा, किंमत फक्त 6 रुपये

Integra Essentia Share Price

Penny Stocks | इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 310 टक्के वाढली आहे. ही कंपनी अन्न, कृषी, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा संबंधित क्षेत्रात व्यवसाय करते. शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 1.59 टक्के घसरणीसह 6.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Integra Essentia Share Price)

नुकताच इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने सेबीला कळवले आहे की, कंपनीने त्यांच्या एकत्रीकरण प्रस्तावाचे मूल्यमापन करण्यासाठी सल्लागार म्हणून प्राइस वॉटर हाऊस फर्मची नियुक्ती केली आहे. प्राइस वॉटर हाऊस अँड कंपनी एलएलपी, प्राइस वॉटर हाऊस कूपर्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीची उपकंपनी सल्लागार फर्म म्हणून काम करते.

इंटेग्रा एसेंशिया कंपनी आणि GG Engineering Limited या कंपनीचे एकत्रीकरण केले जाणार आहे. प्राइस वॉटर हाऊस कूपर्स कर आणि नियामक दृष्टीकोनातून या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाचे परीक्षण करणार आहेत.

इंटेग्रा एसेंशिया या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 291 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः कृषी उत्पादने, कापड आणि वस्त्र, पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा, नवीकरणीय ऊर्जा उपकरणे या संबंधित व्यवसायात लक्षणीय विस्तार करण्याची योजना आखत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमध्ये इंटेग्रा एसेंशिया कंपनीचा निव्वळ नफा 100 टक्के वाढीसह 1.18 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत या कंपनीने एकूण 56 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील 5 वर्षांत, इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 280 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9.45 रुपये होटिम तर नीचांक पातळी किंमत 5.21 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks Integra Essentia Share Price 08 October 2023.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x