14 December 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

GST on Bank Passbook | उद्या 18 जुलै | उद्यापासून मोदी सरकार तुमच्या बँक पासबुकवर देखील 18 टक्के GST वसूल करणार

GST on Bank Passbook

GST on Bank Passbook | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कशावर जीएसटी लागेल याचा भरवसा नाही, असे अनेकजण म्हणतात. तसेच घडण्यास मागील काही काळापासून सुरुवात झाली आहे. तुमच्या बँकेच्या पासबुकावरही आता तुम्हाला तब्बल 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काही वस्तू स्वस्त, तर काही वस्तू आणि सेवा महागणार असून 18 जुलैपासून पासबुकवरील जीएसटी देखील अंमलात येईल.

हे सर्व होणार खूप महाग :
बँक चेकबुक :
चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारलेल्या शुल्कावर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल.

पॅकबंद अन्‍न :
दही, लस्सी, पनीर, मध, गहू आणि मांस (गोठवलेले वगळता) यासारख्या प्री-पॅक खाद्यपदार्थ्यांवर पूर्वी सूट होती. आता त्यावर 5 टक्के जीएसटी लागू होईल.

हॉटेल रुम्स आणि हॉस्पिटल बेडस् :
रु. 1,000 प्रतिदिवसापेक्षा कमी दराच्या हॉटेल रूम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होईल. रु. 5000 प्रतिदिवसपेक्षा अधिक दर असलेल्या रुग्णालयांतील खाटांवर 5 टक्के कर आकारला जाईल (आयसीयू वगळून). म्हणजे उपचार घेणे महाग होणार.

एलईडी लॅम्पस् :
एलईडी लाईटस् आणि लॅम्पस् यांच्यावरील कर 12 वरून 18 टक्के करण्यात आला आहे. कटिंग ब्लेड, पेपर चाकू आणि पेन्सिल शार्पनरवर 18 टक्के कर आकारला जाईल.

पंप्स आणि मशिन्स :
सायकल पंप, टर्बाईन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के कर आकारला जाईल. सोलर वॉटर हीटर्सवरही 12 टक्के कर आकारला जाईल. आधी तो 5 टक्के होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: GST on Bank Passbook from 18 July will be applicable check details 17 July 2022.

हॅशटॅग्स

#GST on Passbook(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x