
Suzlon Vs Infibeam Share | इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीचे शेअर्स एका दिवसात 3.30 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीच्या शेअरची किंमत 13 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 60 टक्के वाढून 21.35 रुपये किमतीवर पोहोचली आहे. इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5041 कोटी रुपये आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 39 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी इन्फिबीम अॅव्हेन्यूज स्टॉक 6.62 टक्के वाढीसह 21.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
20 मार्च 2020 रोजी इन्फिबीम अॅव्हेन्यूज स्टॉक 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यात आता 250 टक्के वाढ झाली आहे. इन्फिबीम अॅव्हेन्यू या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना सुझलॉन एनर्जी कंपनीसारखा नफा कमावून दिला आहे. इन्फिबीम अॅव्हेन्यूज ही आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करणारी आघाडीची कंपनी मानली जाते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना डिजिटल पायाभूत सुविधा सेवा प्रदान करण्याचे काम करते.
इन्फिबीम अॅव्हेन्यूज ही कंपनी डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स, एंटरप्राइझ सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, कर्ज समाधानांसह विविध प्रकारचे आर्थिक सेवा प्रदान करते. या कंपनीचे कामकाज भारतासह आखाती देश आणि अमेरिकेत देखील मोठ्या प्रमाणात चालते. आता ही कंपनी ऑस्ट्रेलियापर्यंत आपल्या व्यवसाय विस्तारची योजना आखत आहे.
इन्फिबीम अॅव्हेन्यूज ही कंपनी आपल्या ग्राहकांना ई-कॉमर्स मार्केटप्लेस इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित सेवा देखील प्रदान करण्याचे काम करते. ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा मॉडेल, तृतीय पक्ष क्षमता आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म व्यवसाय इत्यादी सेवा प्रदान करते.
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीने आपला आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही महसूल आणि निव्वळ नफा कमावला आहे. इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीचे कॅश इन फ्लो प्रमाण 400 कोटी रुपये किमतीवर पोहचले आहेत. इन्फिबीम अॅव्हेन्यूज कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3000 ते 3300 कोटी रुपये महसूल संकलनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.