15 December 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

IRFC Share Price | IRFC शेअरने 6 महिन्यात दिला 204 टक्के परतावा, पण हा स्टॉक किती परतावा देऊ शकतो?

IRFC Share Price

IRFC Share Price | 2023 या वर्षात रेल्वे स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या काही रेल्वे कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीचा.

IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आता IRFC कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक श्रेणीतून बाहेर पडले आहेत. कारण हा स्टॉक 100 रुपये किमतीच्या पार गेली होती. मात्र आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी IRFC स्टॉक 0.61 टक्के वाढीसह 98.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीचे शेअर्स एक टक्क्याच्या घसरणीसह 97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 डिसेंबर 2023 रोजी IRFC कंपनीचे शेअर्स 104.14 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 216.53 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2023 या वर्षाच्या सुरुवातीला IRFC कंपनीचे शेअर 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भारत सरकारने रेल्वे क्षेत्रातील विकासासाठी सर्वाधिक निधी वाटप केला आहे. वंदे भारत रेल्वे गाड्या आणि रेल्वे डबे यांच्या सेवांमध्ये सुधारणा झाल्यामुळे रेल्वे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

IRFC कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील वर्षी सप्टेंबर तिमाहीत IRFC कंपनीने 1,714.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर या तिमाहीत कंपनीने 1.549.87 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. IRFC कंपनीने आपल्या ऑपरेशन्समधून 6766.32 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात कंपनीने 5,809.80 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

IRFC कंपनीचे 86.36 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 13.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक सल्लागारांच्या मते, IRFC कंपनीचे शेअर्स पुढील काळात 125 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

मागील एका महिन्यात IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 204 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 26 December 2023.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x