 
						Bonus Shares | मागील 6 महिन्यांत अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्केपेक्षा जास्त नफा कमवून दिला होता. आता या कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
सेबीला दिलेल्या माहितीत अवांटेल लिमिटेड कंपनीने माहिती दिली की, कंपनीने आपल्या 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 2 मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट अद्याप निश्चित केलेली नाहीये. आज बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.36 टक्के वाढीसह 334.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अवांटेल लिमिटेड ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना दुसऱ्यांदा बोनस शेअर्स वाटप करणार आहे. यापूर्वी कंपनीने जून 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यांनतर या कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित केले होते.
यामुळे अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत 10 रुपयेवरून कमी होऊन 2 रुपये किमतीवर आली होती. अवांटेल लिमिटेड कंपनी नियमित अंतराने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करत असते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 270 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका वर्षभरात अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 200 टक्के वाढली आहे. अवांटेल लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्सची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये 324.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		