
Piccadily Agro Share Price | मागील पाच दिवसांत पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 51 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 163 टक्के वाढली आहे.
मागील सहा महिन्यांत शेअरने 495 टक्के परतावा दिला
मागील सहा महिन्यांत पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 495 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 592 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 283.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड ही हरियाणा स्थित कंपनी मद्यनिर्मितीच्या व्यवसाय गुंतलेली आहे. या कंपनीच्या शेअरने जुलै 1997 पासून ते 2023 पर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 113260 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या काळात पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.33 कोटी रुपये झाले आहे.
21 सप्टेंबर 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 103.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 29 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 114.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र त्यानंतर पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीला एक जागतिक पुरस्काराने गौरवण्यात आले आणि हा स्टॉक अचानक रॉकेट सारखा वर जाऊ लागला. पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या ‘इंद्री दिवाळी कलेक्टर्स एडिशन 2023’, या ब्रँडला जगातील सर्वोत्तम व्हिस्की ब्रँड म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत.
पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आता 283.40 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 38.10 रुपये होती. पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा ब्रँड असलेली इंद्री व्हिस्कीची किंमत सर्व राज्यात वेगवेगळी आहे.
हरियाणातील गुरुग्राममध्ये या व्हिस्कीची एक 750 मिली बाटली 3,100 रुपये किमतीला विकली जाते. तर Truscoop या वेबसाइटनुसार, महाराष्ट्रात इंद्री व्हिस्कीच्या एका बॉटलची किंमत 5100 रुपये आहे. हरियाणा, यूपी, गोवा आणि देशाची राजधानी दिल्लीमध्ये या व्हिस्कीची एक बॉटेल 3100 रुपये किमतीवर विकली जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.