4 May 2025 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB
x

IFL Share Price | होय! वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, अल्पावधीत दिला 3800 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या

IFL Share Price

IFL Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना IFL एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.7 टक्क्यांच्या वाढीसह 12.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IFL एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 277 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.16 रुपये होती.

IFL एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे, की कंपनी आपल्या शेअर धारकांना बायबॅक, लाभांश आणि बोनस शेअर्स वाटप करण्याची योजना आखत आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी IFL एंटरप्रायझेस स्टॉक 6.83 टक्के घसरणीसह 11.33 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 1 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे सर्व प्रलंबित निर्णय मार्गी लागतील. आयएफएल एंटरप्रायझेस कंपनी शेअर बाय बॅक योजनेचा विचार करत आहे. ही कंपनी आपल्या एकूण पेड अप कॅपिटलच्या 10 टक्के आणि फ्री रिझर्व्ह शेअर बायबॅक म्हणून खरेदी करू शकते.

शेअर होल्डर व्हॅल्यू वाढवण्यासाठी या कंपनीने बाय बॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर 2023 रोजी IFL एंटरप्रायझेस कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांश आणि बोनस शेअर्सबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

IFL एंटरप्रायझेस कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. नुकताच आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीला 730 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअर धारकांना अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. मागील 5 वर्षांत IFL एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 21 सप्टेंबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर 0.37 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीने नुकताच चार्टर पेपर सोबत एक व्यापारी करार केला आहे. या दोन्ही कंपन्यांमधील करारा अंतर्गत कागद निर्मिती, साठवणूक आणि वितरणाच्या कामात सहकार्य केले जाणार आहे. चार्टर पेपर ही एक ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय पेपर निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.

आयएफएल एंटरप्रायझेस लिमिटेड ही कंपनी कागद आणि स्टेशनरी वस्तूंच्या व्यापारात भारतातील सर्वात मोठी आघाडीची कंपनी मानली जाते. नुकताच या कंपनीला 1.92 अब्ज रुपये मूल्याची निर्यात ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीला सिद्धेश ग्लोबल लिमिटेड कंपनीकडून देण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IFL Share Price today on 17 October 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IFL Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या