13 December 2024 11:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

IRFC Vs Texmaco Rail Share | रेल्वे संबंधित शेअर्स तेजीत! IRFC आणि टॅक्समॅको रेल शेअर्स तेजीत, कोणता तेजीने मल्टिबॅगर परतावा देणार?

IRFC Vs Texmaco Rail Share

IRFC Vs Texmaco Rail Share | मागील काही महिन्यांपासून रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. सध्या तुम्ही रेल्वे स्टॉक खरेदी करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे.

टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले तिमाही निकाल आज जाहीर केले आहेत. मजबूत तिमाही निकालानंतर टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीचे शेअर 3.71 टक्के वाढीसह 138.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात 11 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. आज देखील कंपनीचे शेअर्स 3 टक्के पेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीने 25 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नद्यात 66 टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीने 15 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाही काळात टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीने 805 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील 6 महिन्यांत टॅक्समॅको रेल अँड इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5.80 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 10.90 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Texmaco Rail Share NSE 17 October 2023.

हॅशटॅग्स

#IRFC Vs Texmaco Rail Share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x