
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा जून तिमाहीच्या तुलनेत दुप्पट वाढून 668.18 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने सोमवारी सेबीला माहिती दिली की, मागील तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 331.92 कोटी रुपये नोंदवला गेला होता. JFSL Share Price
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीतून विलग झाल्यावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने जाहीर केलेला हा पहिलाच आर्थिक निकाल आहे. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 219.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने सप्टेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत 608.04 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जून तिमाहीत या कंपनीने 414.13 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीच्या महसूल उत्पन्नात वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 216.85 कोटी रुपये मिळाले होते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले होते की, कंपनीने पूर्ण विकसित वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी बनण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने एक मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापन का करण्याची योजना आखली होती. यासह कंपनीने विमा क्षेत्रातही व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 224.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या वेळी कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 265 रुपये आणि NSE इंडेक्सवर 262 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. रिलायन्स कंपनीतून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे विलगीकरण करताना रिलायन्स कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना एका शेअरवर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा एक शेअर दिला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.