19 April 2024 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

SIP Calculator | होय शक्य आहे? फक्त 17 रुपयाच्या बचतीतून करो मध्ये परतावा मिळेल, कसं ते SIP गणित पहा

SIP Calculator

SIP Calculator | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आणि गोंधळ पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात नकारात्मक भावना असताना गुंतवणूक करणे धोक्याचे आहे. पण गुंतवणूक करण्याचे इतर अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर म्युचुअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP. हा एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. म्युचुअल मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता.

अल्प गुंतवणूक करून तुम्हाला भरघोस परतावा कमवायचा असेल तर म्युचुअल फंड योजना तुम्हाला मालामाल करु शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा म्युचुअल फंड योजना बद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू शकता. या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही दररोज 17 रुपये जमा करू शकता, आणि दीर्घकाळासाठी या योजनेत गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळेल.

म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते. ते म्हणजे एकरकमी आणि SIP. SIP पद्धतीने तुम्ही म्युचुअल फंडात दर मासिक 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. मागील काही वर्षांत म्युच्युअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 20 टक्के परतावा मिळवून दिला आहे. म्युचुअल फंडमध्ये प्रति महिना 500 रुपयांच्या SIP सह तुम्ही करोडपती बनू शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात रोज फक्त 17 रुपये जमा करावे लागतील.

गुंतवणुकीवर परतावा :
20 वर्ष कालावधीसाठी तुम्ही दरमहा 500 रुपये नियमित जमा केल्यास तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 1.2 लाख रुपये असेल. 20 वर्ष कालावधीत 15 टक्के वार्षिक परताव्यानुसार तुम्हाला 7 लाख 8 हजार रुपये परतावा मिळेल. जर तुम्हाला सरासरी वार्षिक 20 टक्के परतावा मिळाला तर तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 15.80 लाख रुपये परतावा मिळू शकतो.

करोडपती बनण्याची युक्ती :
जर तुम्ही म्युचुअल फंड योजनेत 30 वर्ष कालावधीसाठी दरमहा 500 रुपये जमा करायला सुरुवात केली तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 1.8 लाख रुपये जमा होईल. समजा तुम्हाला 30 वर्षांच्या कालावधीत सरासरी वार्षिक चक्रवाढ पद्धतीने 20 टक्के परतावा मिळाला तर तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला 1.16 कोटी रुपये परतावा मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SIP Calculator For Counting Returns on Mutual Fund SIP investment on 26 December 2022

हॅशटॅग्स

#SIP Calculator(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x