 
						Mamaearth IPO | मामाअर्थ ब्रॅण्डची मूळ कंपनी असलेल्या होनासा कन्सुमर कंपनीचा IPO लवकरच लाँच होणार आहे. मामाअर्थ कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 308 रुपये ते 324 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. मामाअर्थ कंपनीच्या IPO मधून गुंतवणुकदारांना फायदा मिळणार की नाही, हे तर IPO नंतरच समजेल. मात्र या IPO तून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मजबूत फायदा कमावणार हे नक्की.
शिल्पा शेट्टीची नफा वसुली :
मामाअर्थ कंपनीचा IPO ha ऑफर फॉर सेलसाठी असेल. या IPO मध्ये शेअर्स विकणाऱ्या व्यक्तींमध्ये बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील सामील आहे. शिल्पा शेट्टीने मामाअर्थ कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. आता तिने आपले 5,54,700 शेअर्स IPO द्वारे विक्रीचा निर्णय घेतला आहे. शिल्पा शेट्टीने मामाअर्थ कंपनीचे शेअर्स 41.86 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले होते. यासाठी त्यांनी मामाअर्थ कंपनीमध्ये 2.32 कोटी रुपयेची गुंतवणूक केली होती.
मामाअर्थ कंपनीने IPO साठी दाखल केलेल्या DRHP तपशिलानुसार, मामाअर्थ कंपनीच्या प्रवर्तकांच्या यादीत शिल्पा शेट्टी कुंद्राचे नाव सामील आहे. त्यांनी आगामी IPO मध्ये आपली हिस्सेदारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मामाअर्थ कंपनीच्या IPO मधील 324 रुपये या अप्पर प्राइस बँडनुसार शिल्पा शेट्टीला 17,97,22,800 रुपये मिळतील. म्हणजेच त्यांना एकूण 15.65 कोटी रुपये नफा मिळू शकतो.
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, मामाअर्थ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 30 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ही ग्रे मार्केट किंमत गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली मानली जात आहे. मामाअर्थ कंपनीचा IPO 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. 30 ऑक्टोबर 2023 रोजी मामाअर्थ कंपनीचा IPO अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		