
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल मधील टाटा मोटर्सच्या सिंगूर प्लांटमध्ये झालेल्या नुकसानीसाठी टाटा मोटर्स कंपनीला 766 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. लवाद न्यायाधिकरणाने सोमवारी पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाला ही भरपाई देण्याचे आदेश जारी केले आहेत.
या निर्णयानंतर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स इंट्रा-डे ट्रेड मध्ये 642.50 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.47 टक्के वाढीसह 631.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा मोटर्स कंपनीने पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे टाटा नॅनो गाडीचा प्लांट उभारला होता. मात्र जमिनीच्या वादामुळे ऑक्टोबर 2008 मध्ये टाटा मोटर्स कंपमा पश्चिम बंगालमधील सिंगूरचा प्लांट हलवून गुजरातमधील सानंद येथे हस्तांतरित करावा लागला होता. त्यावेळी टाटा मोटर्स कंपनीने सिंगूरमध्ये 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती.
आता तीन सदस्यीय लवाद न्यायाधिकरणाने टाटा मोटर्स कंपनीला न्याय दिला आहे. यानुसार टाटा मोटर्स कंपनी प्रतिवादी पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेडकडून 11 टक्के वार्षिक व्याज दराने 765.78 कोटी रुपये रक्कम घेणार आहे.
टाटा मोटर्स कंपनीला मिळणारी ही नुकसान भरपाई 1 सप्टेंबर 2016 पासून ते आतपर्यंत मोजली जाणार आहे. टाटा मोटर्स कंपनीला सिंगूर प्लांट बंद पडल्यामुळे मोठा नुकसान सहन करावा लागला होता, म्हणून टाटा मोटर्स कंपनीने WBIDC नुकसान भरपाई मागितली होती. या नुकसान भरपाईच्या दाव्यात भांडवली गुंतवणुकीवरील तोट्यासह इतर बाबीची देखील भरपाई मागण्यात आली होती.
तीन सदस्यीय लवाद न्यायाधिकरणाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी जारी केलेल्या आदेशात टाटा मोटर्स कंपनीला न्याय दिला आहे. या निर्णयानुसार टाटा मोटर्स कंपनीला कायदेशीर प्रक्रियेत झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून देखील डब्ल्यूबीआयडीसीकडून 1 कोटी रुपये देण्याचा आदेश दिला आहे.
टाटा मोटर्स कंपनीने सिंगूर प्लांट बंद पडल्यानंतर जून 2010 मध्ये नॅनो गाडीचा कारखाना गुजरातमधील साणंदमध्ये हलवला होता. मात्र टाटा मल्टर्स कंपनीने काही वर्षांपूर्वी टाटा नॅनो गाडीचे उत्पादन बंद केले आहे. गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी साणंदमधील प्लांटचे अनावरण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.