14 December 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

RR Kabel Share Price | मालामाल करतोय हा शेअर! फक्त 2 दिवसात दिला 17 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

RR Kabel Share Price

RR Kabel Share Price | आरआर काबेल कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10.4 टक्क्यांच्या वाढीसह 1550 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. आरआर काबेल कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर तिमाहीत आरआर काबेल कंपनीने दुप्पट निव्वळ नफा कमावला आहे.

या कंपनीचे शेअर्स 20 सप्टेंबर 2023 रोजी 14 टक्के प्रीमियम वाढीसह 1,180 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत 1,035 रुपये होती. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी आरआर काबेल स्टॉक 6.04 टक्के वाढीसह 1,618.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आरआर काबेल कंपनीचे शेअर्स लिस्टिंग झाल्यापासुन 31 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किमतीच्या तुलनेत तब्बल 50 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये आरआर काबेल स्टॉक 3 टक्क्यांनी घसरला होता, तर नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर 13 टक्क्यांनी वाढला आहे. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 112 टक्क्यांच्या वाढीसह 74.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 35 कोटी निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी सप्टेंबर तिमाहीत आरआर काबेल कंपनीने 1,367.2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीने 17.7 टक्क्यांच्या वाढीसह 1,609.7 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या तिमाहीत आरआर काबेल कंपनीचा EBITDA 92.7 टक्क्यांच्या वाढीसह 121.1 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 62.8 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

आरआर काबेल कंपनीचा मार्जिन जून-सप्टेंबर 2023 तिमाहीत 293 अंकांनी वाढून 7.5 टक्क्यांवर पोहचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत आरआर काबेल कंपनीचे मार्जीन 4.6 टक्क्यांवर होते. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने आरआर काबेल कंपनीच्या शेअरवर बाय रेटिंग दिली आहे.

आरआर काबेल ही कंपनी मुख्यतः वायर आणि केबल मेकर म्हणून व्यवसाय करते. ब्रोकरेज फर्मने कंपनीच्या उद्योगातील आघाडीच्या महसूल वाढीचा ट्रॅक रेकॉर्ड, मजबूत दृष्टीकोन, इंडस्ट्री टेलविंड आणि मजबूत कामगिरीमुळे स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी आरआर काबेल कंपनीच्या शेअरवर 1,650 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RR Kabel Share Price NSE 08 November 2023.

हॅशटॅग्स

RR Kabel Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x