10 May 2024 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Gold Rate Today | खुशखबर! दिवाळीमध्ये आज सोन्याचे भाव अजून घसरले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. या धनतेरसला लोकांनी सोन्याची जोरदार खरेदी केली आहे. धनतेरसच्या निमित्ताने देशभरात सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे सोने-चांदी आणि इतर वस्तूंचे व्यवहार झाले. याशिवाय सोन्याचा माल सुमारे 27 हजार कोटी रुपयांना विकला गेला. तर चांदीचाही सुमारे 3 हजार कोटींचा व्यवहार झाला.

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59918 रुपये झाला आहे. तर आदल्या दिवशी सोने 60240 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 322 रुपयांनी घसरला आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 1667 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेला होता.

आज चांदीचा भाव
आज चांदीचा भाव 69,400 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदीचा भाव 70,416 रुपये प्रति किलो ग्रॅम वर बंद झाला होता. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो १०१६ रुपयांची घसरण झाली आहे. चांदी 7064 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी १२ वाजता सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचा वायदा व्यापार 37.00 रुपयांच्या घसरणीसह 59,715.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 498.00 रुपयांनी घसरून 69,534.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज कोणत्या कॅरेट सोन्याचा दर किती:

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 44939 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर २४१ रुपयांनी कमी झाला आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आज 54885 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर २९५ रुपयांनी कमी झाला आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 59678 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ३२१ रुपयांनी कमी झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 59918 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ३२२ रुपयांनी कमी झाला आहे.

Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today  Updates Check Details on 13 November 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(211)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x