3 May 2025 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Fact-Check | भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर झाली? आर्थिक अंधभक्ती सुसाट, फडणवीसांनी केली शेअर, अदाणींनी पोस्ट डिलीट केली

Fact-Check

Fact-Check | रविवारी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था (जीडीपी) पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजा, देवेंद्र फडणवीस आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे.

Devendra-GDP

गौतम अदानी यांनी फेक न्यूज शेअर केली… नंतर पोस्ट डिलीट केली
गौतम अदानी यांनी ही भारताला 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. मात्र, भारत सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारताचा जीडीपी ४ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेल्याच्या व्हायरल सोशल मीडिया पोस्टवर अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सर्व देशांच्या जीडीपीच्या आकडेवारीचा मागोवा घेणे खूप अवघड
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीच्या आधारे सर्व देशांसाठी लाइव्ह ट्रॅकिंग जीडीपी फीडचा एक अप्रमाणित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे, ज्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेकांचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांची आकडेवारी थोड्या फार अंतराने उपलब्ध असल्याने सर्व देशांच्या जीडीपीच्या आकडेवारीचा थेट मागोवा घेणे खूप अवघड आहे.

जीडीपी कसे ओळखावे?
जीडीपीचे दोन प्रकार आहेत. वास्तविक जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी. वास्तविक जीडीपीमध्ये, वस्तू आणि सेवांचे मूल्य आधार वर्ष मूल्यावर किंवा स्थिर किंमतीवर मोजले जाते. सध्या जीडीपी मोजण्याचे आधार वर्ष २०११-१२ आहे. म्हणजे २०११-१२ मधील वस्तू व सेवांच्या दरानुसार गणना. त्याचबरोबर नॉमिनल जीडीपीची गणना सध्याच्या किमतीवर केली जाते.

जीडीपीची गणना कशी केली जाते
जीडीपी वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी चार मुद्दे लक्षात घेतले जातात. पहिलं म्हणजे आपण आणि खाजगी क्षेत्रातील व्यवसाय वाढ. आपण खर्च केलेली रक्कम आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावते. दुसरे म्हणजे खाजगी क्षेत्रातील व्यवसाय वाढ. जीडीपीमध्ये त्याचा वाटा ३२ टक्के आहे. तिसरे म्हणजे सरकारी खर्च. याचा अर्थ सरकार वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर किती खर्च करत आहे. जीडीपीमध्ये त्याचा वाटा ११ टक्के आहे. याशिवाय चौथी मागणी (Demand) आहे.

अजून एक बाजू काय?
देशाची अर्थव्यस्था वाढताना सांगणारे भाजप नेते हा पैसा नेमका जातोय कुठे हे सांगण्यास तयार नाहीत. एकाबाजूला सामान्य लोकांचा खिसा महागाईने खाली होतोय, तर दुसऱ्या बाजूला देशातील हजारो उद्योजकांमध्ये भाजपच्या जवळचे असलेले केवळ गौतम अदानीच भाजपच्या नेत्यांचे अनुकरण करून आणि कोणतीही शहानिशा न करता पोस्ट X वर शेअर करतात आणि नंतर ती डिलीट सुद्धा करतात. यामध्येच त्याचं उत्तर दडलंय की हा ट्रिलियन डॉलर पैसा नेमका जातोय कुठे?

Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Fact-Check India’s GDP reached 4 trillion dollars 20 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Fact Check(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या