TRP Scam मुंबई पोलिसांकडून उघड | केंद्राकडून पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन
नवी दिल्ली, ०५, नोव्हेंबर: TRP Scam वरून मुंबई पोलिसांनी मोठा घोटाळा समोर आणल्यानंतर आणि त्यातून ठराविक प्रसार माध्यमांनी मांडलेल्या आर्थिक बाजार समोर आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागं झालं आहे. मोदी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने TRP घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या संबंधित असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पुनरावलोकन करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. प्रसार भारतीचे CEO शशी शेखर वेम्पती (Prasar Bharati CEO Shashi Shekhar Vempati) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या ४ सदस्यीय समितीला २ महिन्याच्या कालावधीत त्यांचा सविस्तर लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे मुंबई पोलीसांनी टीआरपी घोटाळा उघड केला आणि त्यासंदर्भातील सर्व पुरावे असल्याचे सांगितल्यानंतर फक्त १ महिन्याच्या आतच मोदी सरकारने हा तडकाफडकी निर्णय जाहीर केला आहे. TRP Scam संदर्भात सध्याची मार्गदर्शक तत्वे ही २०१४ साली तयार करण्यात आली आहेत. त्यावेळी TRAI’च्या आणि केंद्रीय संसदीय समितीने स्थापन केलेल्या शिफारशीने या मार्गदर्शक तत्वांची त्यावेळी अधिकृतपणे निर्मिती करण्यात आली होती.
दरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या या समितीने TRP संदर्भातील पूर्वीच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा सखोल अभ्यास करणे, आतापर्यंत या सर्व विषयावर विविध तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांचा विचार करणे आणि उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष कशी राहिल हे पाहणे समितीकडून अपेक्षित आहे. तसेच TRAI’ने नुकत्याच केलेल्या इतर शिफारशींची नोद घेणे या समितीला केंद्राने बंधनकारक केले आहे. मागील महिन्यात शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील एका संसदीय समितीने TRP संदर्भातील सध्याची मार्गदर्शतक तत्वे आणि वापरण्यात येणारे तंत्रज्ञान कुचकामी तसेच कालबाह्य असल्याचे सांगितले होते.
TRP संदर्भात जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याचा देखील सखोल अभ्यास ही समिती करणार आहे. दरम्यान, या समितीत IIT कानपूरचे प्राध्यापक डॉ. शलाभ, सेंटर फॉर पब्लिक पॉलिसीचे डॉ. पुलोक घोष आणि सेंटर फॉर डेवलपमेंट टेलिमॅटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार उपाध्याय यांचा केंद्राने समावेश केला आहे. TRP Scam समोर आल्यानंतर बार्क (BARC) या संस्थेने 2 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या TRP’ला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. आता यावर बार्क (BARC) ची तांत्रिक टीम काम करणार आहे. सामान्य लोकांना पैसे देऊन किंवा त्यांना कोणत्याही स्वरूपात अमिष दाखवून आता अशा प्रकारे रेटिंग वाढवता येणार नाही यासाठी BARC ठोस पावले उचलणार आहे.
News English Summary: The Modi government has woken up after the Mumbai Police exposed a big scam over the TRP scam and the financial markets presented by certain media outlets. The Modi government’s Ministry of Information and Broadcasting has set up a committee to review the relevant guidelines in the wake of the TRP scam. The four-member committee, headed by Prasar Bharati CEO Shashi Shekhar Vempati, has been directed to submit a detailed written report within two months.
News English Title: TRP scam Modi government sets up committee to review News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट