15 May 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Mishtann Foods Share Price | वडापावच्या किंमतीचा आहे हा पेनी शेअर! खरेदीनंतर संयम राखल्यास श्रीमंत करेल

Mishtann Foods Share Price

Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.86 टक्क्यांच्या घसरणीसह 15.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 9 रुपये या आपल्या नीचांक किमतीवरून 72 टक्के वाढले आहेत. आता या कंपनीने जागतिक तांदूळ पुरवठा व्यवसायात पाऊल ठेवण्याची घोषणा केली आहे.

मिष्टान फूड्स कंपनी आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओच्या बळावर जागतिक तांदूळ बाजारात मजबूत उपस्थिती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी मिष्टान फूड्स कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 15.58 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज हा शेअर 3.47% वाढून 16.12 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मागील एका आठवड्यात, मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के वाढली आहे. 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 120 टक्के मजबूत झाला आहे.

मिष्टान फूड्स कंपनी जगभरातील ग्राहकांसाठी प्रीमियम दर्जाचा बासमती तांदूळ लाँच करण्याचा प्रयत्न करत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने काही महिन्यापूर्वी अनेक निर्बंध लादले होते. ग्राहक आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जागतिक तांदूळ बाजारात आपला व्यवसाय वाढविण्याचे उद्दिष्ट मिष्टान फूड्स कंपनीने व्यक्त केले आहे. मागील 5 वर्षात मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरची किंमत 3 रुपयेवरून 16 रुपये किमतीवर पोहचली होती.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1605 कोटी रुपये आहे. मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 16.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.09 रुपये होती. 28 मे 2021 ते आतपर्यंत मिष्टान फूड्स स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के बंपर नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mishtann Foods Share Price NSE 22 November 2023.

हॅशटॅग्स

Mishtann Foods Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x