15 May 2024 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये तेजी, एका दिवसात शेअरने 10 टक्के परतावा दिला, पुढे अजूनही तेजी?

LIC Share Price

LIC Share Price| एलआयसी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर जनरल इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढीसह आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल पाहून ब्रोकरेज फर्मने देखील एलआयसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 9.71 टक्के वाढीसह 677.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नवीन स्कीम लाँच केल्याच्या घोषणेनंतर एलआयसी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एलआयसी कंपनीने विमा पॉलिसीच्या प्रीमियममध्ये दोन अंकी वाढ साध्य करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पुढील काही महिन्यांत एलआयसी कंपनी आणखी 3-4 नवीन पॉलिसी लॉन्च करू शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार वैयक्तिक किरकोळ व्यवसायात चांगली गती निर्माण झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून एलआयसी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये GWP म्हणजेच ग्रॉस लिखित प्रीमियममध्ये वार्षिक आधारावर 13 टक्के वाढ नोंदवली आहे. एलआयसी या सरकारी विमा कंपनीचे मूल्यांकन खूप स्वस्त आहे. मागील दोन ट्रेडिंग सेशनपासून एलआयसी कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.

मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी स्टॉक 608 रुपयेवरून वाढून 678 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी याकाळात 11.5 टक्के नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर, ICICI सिक्युरिटीज फर्मने एलआयसी स्टॉकवर 917 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. एलआयसी कंपनी आपला व्हॅल्यू न्यू बिझनेस वाढवण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीने आपले संपूर्ण लक्ष नवीन प्लॅन्स आणि नॉन-एजन्सी वितरण चॅनेलवर केंद्रीत केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE 25 November 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(98)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x