
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. चीनच्या पेमेंट ग्रुप Alipay ने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे 29 कोटी शेअर्स ब्लॉक डीलमध्ये विकले आहेत. AliPay कंपनीने झोमॅटो कंपनीचे शेअर्स 112 रुपये प्रति शेअर किमतीवर विकले आहेत. अँट ग्रुप कंपनीच्या मालकीच्या Alipay कंपनीने ब्लॉक डील अंतर्गत 3.44 टक्के भाग भांडवल विकत असल्याची माहिती दिली होती.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 119.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 2.32 टक्के वाढीसह 119.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 10 महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 जानेवारी 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 44.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 119.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या झोमॅटो कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपये आहे. झोमॅटो कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 126.10 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 44.35 रुपये होती.
मागील 6 महिन्यात झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 मे 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 67.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 119.25 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. 2023 मध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 95 टक्क्यांनी वाढले आहेत.
2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 60.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीचे शेअर्स 87 टक्के मजबूत झाले होते. झोमॅटो कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 76 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स 115 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.