18 May 2024 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD वार्षिक व्याजदराहून अधिक परतावा बँकेचा शेअर 1 महिन्यात देतोय

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट म्हणजे सुप्रसिद्ध सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. जवळपास सर्वच वर्गातील ग्राहकांचा बँक ऑफ महाराष्टवर विश्वास आहे. त्यामुळे ग्राहक बँक ऑफ महाराष्टच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवून अपेक्षित परतावा कमाई करत आहेत. पण एकूण परतावा आकडेवारीचा विचार केल्यास बँक ऑफ महाराष्टचा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतं असल्याचं पाहायला मिळतंय.

1 महिन्यात 6.71% परतावा दिला
बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरचा भाव आज, 05 डिसेंबर 2023 रोजी 0.65% ने वाढला आहे. हा शेअर सध्या 46.15 प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरच्या किमतीवर बारकाईने लक्ष ठेवून कमाई करावी असं तज्ज्ञ सांगत आहेत. मागील एका महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र शेअरने गुंतवणूकदारांना 6.71% परतावा दिला आहे. तर दुसरीकडे बँक ऑफ महाराष्ट्रच्या FD वर वर्षाला 6.50% परतावा मिळतोय.

Bank of Maharashtra Share Price

बँक ऑफ महाराष्टची आर्थिक स्थिती उत्तम
जर बँकेच्या FD पासून ते RD योजनांच्या व्याजाची आकडेवारी पाहिल्यास आणि त्याची तुलना बँक ऑफ महाराष्टच्या शेअरमधून मिळणाऱ्या परताव्याशी केल्यास त्यात प्रचंड फरक पाहायला मिळतो. शेअर बाजारात गुंतवणुकीवर जोखीम लक्षात घेतली तरी बँक ऑफ महाराष्टची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचं पाहायला मिळतं. तसेच बँकेचा मागील ट्रॅक रेकॉर्ड आणि इतर टेक्निकल चार्टवर दिसणाऱ्या गोष्टी देखील सकारात्मक असल्याने भविष्यातही बँक ऑफ महाराष्टचा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देईल असंच दिसतं.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या FD ते RD योजना
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअर्सवर मिळणारा परतावा बँक FD पासून ते RD योजनांपेक्षा कितीतरी पटीत आहे आणि पैसा महागाईच्या प्रमाणात वाढत असल्याने गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळतो. अगदी ग्राहकांनी FD किंवा RD १००० रुपयांपासून सुरु करता येते त्याच प्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्राचे शेअर्स SIP प्रमाणे गुंतवणूक करून खरेदी करता येऊ शकतात असं तज्ज्ञ सांगतात.

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्सवर कालावधीनुसार गुंतवणूकदारांना झालेला फायदा
1. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी ५ वर्ष – फायदा मिळाला 233.08%
2. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी १ वर्ष – फायदा मिळाला 57.74%
3. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी ६ महिने – फायदा मिळाला 44.05%
4. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी YTD आधारावर – फायदा मिळाला 57.74%

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra Share Price 05 December 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x