
Birlasoft Share Price | बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 297.50 रुपयेवरून वाढून 650 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
या वर्षी बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 120 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 658.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिर्लासॉफ्ट कंपनीचे शेअर्स 642.80 रुपये किमतीवर ओपन झाले होते आणि काही तासात शेअरची किंमत 659.85 रुपये या इंट्राडे उच्चांकावर पोहोचली होती. बिर्लासॉफ्ट लिमिटेड हा आयटी स्टॉक मागील काही महिन्यांपासून तेजीमध्ये वाढत आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. 2023 पासून दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बिर्लासॉफ्ट लिमिटेड या स्मॉलकॅप आयटी कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली होती. या आयटी कंपनीने आपले सप्टेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले दिले आहेत.
तज्ञांच्या मते, बिर्लासॉफ्ट कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या मते, बिर्लासॉफ्ट कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर सकारात्मक वाढीचे संकेत देत आहेत. बिर्लासॉफ्ट लिमिटेड स्टॉकमध्ये 635 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे.
तज्ञांच्या मते, नजीकच्या काळात या कंपनीचे शेअर्स 670 रुपये ते 680 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. बिर्लासॉफ्ट कंपनीने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना 7,267.83 टक्के नफा मिळवून दिला आहे. दीर्घ मुदतीत या कंपनीच्या शेअरची किंमत 8 रुपयेवरून वाढून 655 रुपये किमतीवर पोहचली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.