4 May 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मेहतांना नुसते घरी पाठवू नका तर गुन्हाही दाखल करा : जयंत पाटील

NCP, Jayanat Patil, Prakash Mehata

मुंबई : एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एसआरए घोटाळ्याच्या आरोपांवरून पायउतार करण्यात आलेले मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मंत्री प्रकाश मेहता गृहनिर्माण खात्याचा गैरफायदा घेत एस.डी. कॉर्पोरेशनसंबंधित एसआरए प्रकल्पात प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून बांधकाम व्यवसायिकाकासाठीच काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी नेमण्यात आलेल्या लोकायुक्त अहवालात प्रकाश मेहता यांच्यावर जाणीवपूर्वक केलेल्या त्रुटींवर बोट ठेवण्यात आले होते.

ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात विकासाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहतांवर आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. इतकेच नव्हे तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मेहता यांना वगळण्यात आले होते.

दरम्यान राज्य सरकारने अलीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रकाश मेहता यांना वगळले. लोकायुक्तांचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांनी दडवून ठेवला. त्यामुळे भ्रष्टाचार झाला हे शेंबडे पोरगं पण सांगू शकते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. इतकच नव्हे तर त्यामुळे मेहतांना केवळ घरी पाठवून काही होणार नाही. प्रकाश मेहतांवर गुन्हा हा दाखल व्हायलाच हवा, अशी मागणीही पाटील यांनी केली.

जयंत पाटील यांनी विधानसभेत देखील ही मागणी केली आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)#Prakash Mehata(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x