18 May 2024 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या
x

Vikas Ecotech Share Price | या पेनी शेअरची किंमत 3 रुपये! अल्पावधीत दिला 500 टक्के परतावा, स्वस्त शेअर खरेदी करावा?

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तीन टक्क्यांच्या वाढीसह 3.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 467 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.05 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये होती.

मागील 6 महिन्यांत विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 17 टक्के वाढवले आहेत. सध्या या कंपनीवर 42.5 कोटी रुपये कर्ज आहे. आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी विकास इकोटेक स्टॉक 1.49 टक्के वाढीसह 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले की, कंपनीने आपल्या पूर्वनिर्धारित कर्ज कपात कार्यक्रमानुसार 12.3 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहेत. चालू आर्थिक वर्षात विकास इकोटेक कंपनीने कर्ज परतफेडीची करण्याची योजना आखली होती.

या कंपनीने ऑगस्ट-सप्टेंबर 2021 नंतर 118.7 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहेत. विकास इकोटेक कंपनीवर एकूण 161.5 कोटी रुपये कर्ज होते, जे आता कमी होऊन 42.5 कोटी रुपयेवर आले आहे. विकास इकोटेक कंपनीने आतापर्यंत आपले 74 टक्के कर्ज फेडून कर्जमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

मागील 3 वर्षांत विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के परतावा कमावून दिला आहे. विकास इकोटेक लिमिटेड ही कंपनी मुख्यतः प्लास्टिक आणि रबर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना सेवा प्रदान करणारी विशेष पॉलिमर, विशेष जोड आणि केमिकल उत्पादन करणारी कंपनी आहे. विकास इकोटेक कंपनीचा प्रमुख ग्राहक वर्ग कृषी, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, इलेक्ट्रिकल, फुटवेअर, फार्मा, ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय उपकरण क्षेत्रात विस्तारला आहे.

विकास इकोटेक कंपनीने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवीन उत्पादने सामील करून आणि विविध बाजारपेठेत विस्तार करून व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनी प्लास्टिसायझर उत्पादन व्यवसायाचे अधिग्रहण करण्याची योजना आखली आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादन श्रेणीत मजबूत वाढ होणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price BSE 13 December 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x