11 May 2024 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Paytm Share Price | मागील 12 दिवसात पेटीएम शेअर्स 26 टक्के घसरले, कोणत्या कारणाने होतेय घसरण? पुढे काय करावं?

Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएमचे संचालन करणाऱ्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या घसरणीसह 617 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ओपन झाले होते, मते नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले होते. तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील पेटीएम स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे.

पेटीएम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 998 रुपये होती. मात्र सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 37 टक्के खालील किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम स्टॉक 6 टक्के घसरून 617 रुपये या नीचांक किमतीवर क्लोज झाला होता. आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 3.20 टक्के घसरणीसह 596.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 12 ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स तब्बल 26 टक्के घसरले आहेत. पेटीएम कंपनीने सेही कळवले आहे की, कंपनीने 50000 रुपयेपेक्षा कमी वैयक्तिक कर्जे वाटप सेवेत घट करत असल्याची माहिती दिली होती. या अपडेटनंतर शेअर घसरणीला सुरुवात झाली होती. कर्जाच्या वाढत्या मागणीनंतर बँकांनी ग्राहकांना कर्ज देण्याचे नियम कडक केले आहेत.

फिनटेक कर्जदात्यानी माहिती दिली की, ते कमी-जोखीम आणि उच्च-क्रेडिट-पात्र ग्राहकांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्जाच्या पोर्टफोलिओचा विस्तार करतील. कंपनीच्या मते 50,000 रुपयेपेक्षा अधिक कर्जासाठी बाजारातून “चांगली मागणी” येण्याची अपेक्षा आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वैयक्तिक कर्ज देताना संभाव्य नुकसानीची भरपाई करण्यासाठी बँका आणि बिगर बँकिंग कर्जदात्याना आवश्यक असलेल्या भांडवलाच्या प्रमाणात वाढ केली आहे. अशा लहान 50,000 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या कर्जात थकबाकी वाढल्यानंतर, आरबीआयने कर्ज वाटप करण्याचे आपले नियम कडक केले आहेत.

यावर पेटीएम कंपनीने म्हंटले आहे की, आमच्या गुंतवणुकदार आणि भागीदारांशी सल्लामसलत करून कंपनीने 50,000 रुपयेपेक्षा कमी रकमेच्या कर्ज वाटप सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः पेटीएम कंपनीचे 50,000 रुपये पेक्षा कमी रकमेचे कर्जे प्रमाण हे पेटीएम कंपनीच्या एकूण कर्ज वाटप व्यवसायाच्या 38 टक्के आहे. पेटीएम कंपनीद्वारे वितरीत केलेल्या कर्जाच्या मूल्यावर तिमाही-दर-तिमाही 15 टक्के नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price NSE 13 December 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x