6 May 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर
x

Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीसंबंधित या बातमीचा किती फायदा होईल?

Adani Ports Share Price

Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाने नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे 500 कोटी रुपये निधी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 3.08 टक्के वाढीसह 1,074.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 1038.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. NCDs व्यतिरिक्त कंपनीच्या संचालक मंडळाने नॉन क्युम्युलेटिव्ह रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्सद्वारे 250.20 कोटी रुपये निधी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. निधी उभारणीच्या दोन्ही प्रक्रिया खाजगी प्लेसमेंटद्वारे पूर्ण करण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे.

अदानी पोर्ट्स कंपनी या रोख्यांची मुदतपूर्ती वाटप इत्यादींबाबत पुढील काही दिवसांत निर्णय जाहीर करेल. मीडिया रिपोर्टनुसार, ग्लोबल ब्रोकरेज हाऊस सिटी फर्मने अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग दिली आहे. मागील एका महिन्यात अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Ports Share Price NSE 13 December 2023.

हॅशटॅग्स

Adani Ports Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x