
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. विशेष रासायन उत्पादन उद्योगात व्यवसाय करणाऱ्या विकास इकोटेक कंपनीने नुकताच आपले 119 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटपर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
या कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार विकास इकोटेक कंपनीवर फक्त 42.5 कोटी रुपये कर्ज शिल्लक राहिले आहे. आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के वाढीसह 3.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विकास इकोटेक कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंत कर्जदात्यांचे 118.70 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस विकास इकोटेक कंपनी कर्जमुक्त होईल. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळाली होती. ट्रेडिंग दरम्यान विकास इकोटेक स्टॉक 1.50 टक्के घसरणीसह 3.30 रुपये किमतीवर पोहचला होता.
विकास इकोटेक ही कंपनी मुख्यतः प्लास्टिक आणि रबर उद्योगांना विशेष पॉलिमर आणि विशेष ऍडिटीव्ह रसायने पुरविण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. विकास इकोटेक कंपनी कृषी, इन्फ्रा, पॅकेजिंग, इलेक्ट्रिकल, फुटवेअर, फार्मास्युटिकल्स, ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय उपकरणे या क्षेत्रात देखील व्यवसाय करते. सप्टेंबर 2023 तिमाहीत विकास इकोटेक कंपनीने 60.74 कोटी रुपयेची निव्वळ विक्री साध्य केली होती.
मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीची विक्री 54.78 टक्के कमी झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत विकास इकोटेक कंपनीने 1.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 50.15 टक्के घसरण झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत विकास इकोटेक कंपनीचा एबिटा 5.25 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.