5 May 2024 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

GHCL Share Price | शेअरची किंमत 79 रुपये! कंपनीच्या महत्वाच्या घोषणेने शेअर भविष्यात मजबूत परतावा देईल

GHCL Share Price

GHCL Share Price | जीएचसीएल टेक्सटाईल या सूत उत्पादन करणाऱ्या कंपनीने तामिळनाडू राज्यात उत्पादन क्षमता विस्तार करण्यासाठी 535 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीने नुकताच तमिळनाडू येथील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामध्ये कंपनीने उत्पादन क्षमता विस्तारासोबत अक्षय ऊर्जा क्षेत्रात ही भरघोस कार्य करण्याचे वचन दिले आहे.

यासाठी जीएचसीएल टेक्सटाईल कंपनी एकूण 1,035 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी जीएचसीएल टेक्सटाईल स्टॉक 2.56 टक्के घसरणीसह 79.95 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीच्या नवीन गुंतवणूक योजनेमुळे कंपनीच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत 75 मेगावॅटची अधिक भर पडणार आहे. जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीने माहिती दिली की, “तामिळनाडू आणि भारतात व्यवसाय वाढ करणे ही कंपनीसाठी सन्मानाची गोष्ट आहे. ही गुंतवणूक कंपनीच्या भागीदारांना सतत कमाईच्या विस्ताराद्वारे मूल्य प्रदान करण्याच्या अनुषंगाने करण्यात येत आहे. पुढील चार वर्षांत जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीची गुंतवणूक क्षमता आणि उत्पादन विस्तार, हरित ऊर्जा पोर्टफोलिओ यांच्या विस्तारासह कापड उत्पादनाच्या वाढीसाठी वापरली जाईल”.

जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्के वाढीसह 84.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील वर्षी ऑक्टोबर 2023 महिन्यात जीएचसीएल टेक्सटाईल स्टॉकने 92.50 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 19.15 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एकूण 80.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीमध्ये नीलभ आणि अनुराग दालमिया यांच्यासह इतर 3 वैयक्तिक प्रवर्तक सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GHCL Share Price NSE Live 15 January 2024.

हॅशटॅग्स

#GHCL Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x