1 April 2023 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या Deep Industries Share Price | हा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत पाच पट घटणार, खरेदी करणार? IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा Apollo Pipes Share Price | या कंपनीच्या शेअरची किंमत इतक्या तेजीत वाढली की गुंतवणुकदार करोडपती झाले, परतावा पाहून गुंतवणूक करा April Month Horoscope | एप्रिल महिन्यात 12 राशींमध्ये कोणाला नशिबाची साथ? कोणासाठी मोठी संधी? तुमचं मासिक राशीभविष्य वाचा Odysse Vader e-Bike | ओडिसे वडर ई-बाइक लॉन्च, फुल चार्ज वर 125 किमी रेंज, 999 रुपये टोकन देऊन बुक करा SRF Share Price | या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.20 कोटी रुपये परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस, खरेदी करावा का?
x

Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर?

Adani Total Gas share price

Adani Total Gas Share Price | अदानी उद्योग समूहामधील कंपन्यांच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी समूहातील सर्व कंपन्याचे शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेड करत आहेत. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे ‘अदानी टोटल गॅस’ चे शेअर्स सध्या 5.00 टक्के घसरणीसह 1,622.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 51 टक्के खाली पडले आहेत. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी ग्रुपमधील सर्व शेअर्समध्ये उतरती कळा लागली. या अहवालात अदानी उद्योग समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेअर्सवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Total Gas Share Price | Adani Total Gas Stock Price | BSE 542066 | NSE ATGL)

स्टॉकमध्ये लोअर सर्किट :
अदानी टोटल कंपनीचे शेअर्स मागील चार ट्रेडिंग सेशनपासून लोअर सर्किटवर ट्रेड करत आहेत. आजही या कंपनीचे शेअर 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसांत शेअरची किंमत 3,885 रुपयांवरून 1622 रुपयेवर आली आहे. सध्या अदानी टोटल व्यतिरिक्त, अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स देखील 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 23 टक्के खाली आले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून 35 टक्के खाली आले आहेत. अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत आहेत.

क्रेडिट सुईस ग्रुपने अदानीला दिला दणका :
क्रेडिट सुइस ग्रुप एजीने गौतम अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे बॉण्ड्स त्यांच्या खाजगी बँकिंग संस्थांकडून मार्जिन कर्जासाठी तारण म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. स्विस कंपनी क्रेडिट सुइस ग्रुप एजीच्या खाजगी बँकिंग शाखाने ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’, ‘अदानी ग्रीन एनर्जी’ , ‘अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड’, यांनी विकलेल्या नोट्स ला शून्य मूल्यांकन दिले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Total Gas Share Price 542066 ATGL stock market live on 03 February 2023.

हॅशटॅग्स

#Adani Total Gas Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x