19 May 2024 3:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

DOMS IPO | पहिल्याच दिवशी डोम्स इंडस्ट्रीज IPO गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देणार, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजीत

DOMS IPO

DOMS IPO | डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO अवघ्या एका तासात पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासात 3.89 पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल श्रेणीचा वाटा सर्वाधिक म्हणजेच 11.84 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या IPO ची प्राइस बँड 750 ते 790 रुपये जाहीर करण्यात आली होती.

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 18 शेअर्स ठेवले होते. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,220 रुपये जमा करावे लागले होते. कोणताही गुंतवणूकदार या IPO मध्ये कमाल 14 लॉट खरेदी करू शकत होता. या कंपनीचा IPO 15 डिसेंबर 2023 रोजी बंद होणार आहे. तर गुंतवणूकदारांना IPO शेअर्सचे वाटप 18 डिसेंबर 2023 पर्यंत केले जातील.

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 75 रुपये सूट दिली होती. या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही निर्देशांकावर सूचीबद्ध केले जाणार आहे. ग्रे मार्केटमध्ये डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली होती.

ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 495 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, IPO शेअरची किंमत बँड आणि ग्रे मार्केट किंमत विचारात घेता, डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1285 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DOMS IPO for investment 14 December 2023.

हॅशटॅग्स

DOMS IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x