15 December 2024 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट

BEL Share Price

BEL Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. असाच एक स्टॉक आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारी बीईएल कंपनीचे शेअर 331.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.14 टक्के वाढीसह 333.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

04 जून 2024 रोजी लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या दिवशी बीईएल कंपनीच्या शेअर्सनी 20 टक्क्यांचा लोअर सर्किट हीट केला होता. त्यादिवशी हा स्टॉक 230.5 रुपये किमतीवर पोहोचला होता. मात्र नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यावर बीईएल स्टॉक पुन्हा तेजीत आला. आगामी अर्थसंकल्पापूर्वी अनेक गुंतवणुकदार आणि तज्ञांच्या नजरा बीईएल स्टॉकवर लागल्या आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड फर्मच्या तज्ञांनी बीईएल स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे उत्पन्न पुढील दोन वर्षांत 20 टक्के दराने वाढू शकते. शेअर बाजारातील 20 पेक्षा जास्त तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीईएल कंपनीने घोषणा केली की त्यांना ट्रान्समिट-रिसीव्ह मॉड्यूल्सच्या निर्मिती आणि पुरवठ्यासाठी युरोपस्थित टीआरडीएस म्हणजेच थेल्स रिलायन्स डिफेन्स सिस्टम्स कंपनीकडून 25.75 दशलक्ष युरो म्हणजेच भारतीय चलनात 230 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या टीआर मॉड्यूलचा वापर मुख्यतः लढाऊ विमानांच्या रडारमध्ये केला जातो. 28 जून रोजी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना 192 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 15 July 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x