18 May 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाचा विकास इकोटेक शेअर धुमाकूळ घालणार, अल्पावधीत बनवणार श्रीमंत, अपडेट काय?

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 450 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 5.05 रुपये होती.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला स्मार्ट संयुग्मित पॉलिमर नॅनो कंपोझिटचे पेटंट मिळाले आहे. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी विकास इकोटेक स्टॉक 3.08 टक्के वाढीसह 3.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीने गंजापासून संरक्षण मिळवण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले होते. ज्यासाठी कंपनीने पेटंट अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला मंजुरी मिळाली आहे. विकास इकोटेक कंपनीला 12 डिसेंबर 2023 रोजी भारतीय पेटंट कायदा 1970 च्या कलम 43 अंतर्गत गंज विरोधी संरक्षणासाठी स्मार्ट संयुग्मित पॉलिमर नॅनो कंपोझिटचे पेटंट मिळाले आहे.

विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीवर सध्या 42.5 कोटी रुपये कर्ज आहे. विकास इकोटेक कंपनीवर एकूण 161.5 कोटी रुपये कर्ज होते, जे आता कमी होऊन 42.5 कोटी रुपयेवर आले आहे. या कंपनीने मागील काही वर्षात आपले 74 टक्के कर्ज परतफेड केले आहेत.

मागील तीन वर्षात विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही कंपनी मुख्यतः ग्राहक कृषी, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, इलेक्ट्रिकल, फुटवेअर, फार्मा, ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय उपकरण आणि घटक निर्मितीच्या क्षेत्रात व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price BSE 15 December 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x